top of page
Logo - DWA (1).png
Logo - DWA (1).png

अध्याय सोळावा - दैवासुरसंपाद्विभागयोग

  • Apr 20
  • 3 min read

आधीच्या अध्यायात आपण सर्वोत्तम अर्थात पुरुषोत्तम अवस्था तसेच दैवगोष्टीची ओळख झाली आणि त्यानंतर आपले दैव आणि त्या संदर्भात आणखी ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा अर्जुनाला झाली. 


परंतु जिथे दैव आहे तिथे आसुर अर्थात राक्षस असणारच ! 


दैव आणि दानव या प्रकृतीचे गुण भिन्न असतात यांना माउली संपत्ती म्हणतात ! 

तर या दोन्ही मूलतः प्रवृत्ती आहेत. ज्यावर दैवी प्रवृत्तीचा प्रभाग आहे ते देव आणि आसुरी प्रवृत्तीचा प्रभाव आहे ते दानव किंवा असुर होय. 


या संदर्भात समजून घेत असताना पूर्वी वाचनात आलेली एक गोष्ट आठवली  ती म्हणजे ४ युगांची ! 

या युगांबद्दल असं  देखील वर्णन केलं जात

सत्ययुग - या युगात असुर आणि दैव प्रवृत्ती या वेगवेगळ्या लोकात राहत होत्या त्यांचा परस्पर संबंध येत नसल्याने संघर्ष आणि कपट होत नव्हते हे सत्याचे आणि नीतीचे युग     म्हणून ओळखले जाते. 


त्रेतायुग - या युगात असुर आणि दैव या दोन्ही प्रवृत्तीचे जीव हे याच भूलोकात परंतु वेगवेगळ्या राज्यात राहत होते. असुर प्रवृत्ती भूलोकावर आल्या नंतर संघर्ष वाढू लागले आणि जेव्हा ते शिघेला पोचले तेव्हा श्रीविष्णूंनी अवतार धारण केला आणि श्रीराम विरुद्ध रावण यांच्यात युद्ध झाले. 


द्वापरयुग - या युगात तर असुर आणि दैव प्रवृत्ती एकाच कुळात वाढल्या त्यामुळे या कुळाचे महायुद्ध म्हणजेच महाभारत होय. 

भगवंताने अर्जुनाला याच युगात गीतेचा उपदेश केला. परंतु तरीही चारही युगातील प्रवृत्ती सामावून घेतील एवढी महती या गीतेची आहे. 


कलयुग - या युगात तर असुर आणि दैव प्रवृत्ती या एकाच मनुष्यात प्रकट झाल्या आहेत त्यामुळेच आपला आपल्याशीच अनेकदा संघर्ष होतो आणि अनेकदा संभ्रम निर्माण होतो. 


तर आता हा संदर्भ लक्षात घेऊ आणि याच दोन प्रवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या "दैवासुरसंपाद्विभागयोग" या अध्यायाला  सुरुवात करू... 


१. दोन प्रकारच्या संपत्ती 

माणसांतील गुणांना माउलींनी संपत्ती असे नाव दिले आहे आणि या २ प्रकारच्या आहेत 


- दैवी संपत्ती अर्थात मनुष्यात कोणते गुण असावेत, माणसाने कसे आचरण करावे. 

- असुरी संपत्ती म्हणजे माणसाने कसे असू नये ! कोणत्या गुणांचा माणसाने त्याग करावा 


यावर जे माणसाने करू नये किंवा एखाद्या प्रवृत्तीपासून लांब राहावे असे असेल तर अशा गोष्टी समजून तरी का घ्यायचा असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला केला ! 

त्यावर भगवंताने असे उत्तर दिले , " कशाचा त्याग करावा हे समजले कि आपोआप आपल्याला खरच काय हवे आहे याची प्रचिती होते. 


२. माणसाचे दोष ज्याचा लवकरात लवकर त्याग केल्याने आपण ईश्वराजवळ जातो. 


- दंभ म्हणजे स्वतःला खूप काही येत असल्याचे भासवणे ! 

- दर्प म्हणजे मूर्खपणाने वागणे , आपले कर्तृत्व शून्य असताना ज्ञानी माणसाल दूषणं देणे होय. 

- अहंकार म्हणजे तर आपण जाणताच ! 

- क्रोध आणि संतापामुळे माणूस योग्य निर्णय घेऊ शकत नाही ! 

- निष्ठुरपणा म्हणजे दुसऱ्याच्या परिस्थितीचा विचार न करता त्याचा अपमान करणे आणि सतत गंभीरपणे समोरच्याला तुच्छ लेखने ! 

- अज्ञान म्हणेज चुकीच्या मार्गाला न जाता योग्य गोष्टीची निवड करावी. 


हे सर्व दोष एकत्र केले कि असुरी प्रवृत्ती निर्माण करते आणि आपल्यासाठी आयुष्यभर छळत राहते ! 


३. असुरी संपत्ती असणाऱ्या माणसाची लक्षणे 

असुरी माणूस कसा असतो ? 

- पाप पुण्य ज्याला कळत नाही. 

- चांगले वर्तन माहित नसते. 

- नेहमीच स्वैराचार करणे, 

- लोकांना छळणे 

- असत्य बोलणं 

- स्वार्थासाठी पाप अथवा गुन्हा करण्याची तयारी असते. 

- सातत्याने वाईट विचारांचा उगम होतो. 

- केवळ दाखविण्यासाठी आणि बढाया मारण्यासाठी दानधर्म आणि समाजसेवा करतात. 

- अविचार यांच्या मनाला भावतो म्हणून दुष्कृत्य करतात/ 

- स्वतःचा मोठेपणा किंवा उद्धटपणा अतोनात भरलेला असतो त्यासमोर इतर दुनिया तुच्छ असते ! 


४. दैवी संपत्ती आणि त्याने प्रभावित माणूस 

हा मनुष्य कसा असतो? 

- निर्भर असतो.  

- नेहमी सत्य बोलतो. 

- अक्रोधतत्व बाळगतो अर्थात त्याला राज येत नाही 

- मी पणाचा त्याग 

- शांती 

- चांगुलपणा 

- स्थिर मन आणि धैर्य 

- अहंकाराचा अभाव 

- क्षमा करणे . 


तर अशी सर्व लक्षणे सांगून झाल्यावर अर्थात अर्जुनाची उत्कठता आणखी वाढली 

अर्जुन भक्तीबद्दल स्वतः बद्दल प्रश्न विचारू लागला इथेच अध्याय सोळावा -  दैवासुरसंपाद्विभागयोग या योगाची सांगता झाली आणि सतराव्या ग्रंथाच्या अर्थात श्रद्धादिनिरूपणयोग या अध्यायाला सुरुवात झाली. 


 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page