अध्याय सतरावा - श्रद्धादिनिरूपणयोग
- Apr 20
- 3 min read
दैव आणि असुर या प्रवृत्ती मधील फरक अर्जुनाने समजून घेतला आणि त्या नंतर दैवप्रवृत्तीने आयुष्याची वृद्धी करावी.
ज्या भगवंताने हा ज्ञानाचा महासागर आपल्याला दाखविला त्या भगवंताला समर्पित व्हावे त्यावर श्रद्धा असावी.
याच विचाराने अर्जुनाने शंका विचारण्यास सुरुवात केली.
तर जराही वेळ न दवडता अध्याय सातवा श्रद्धादिनिरूपणयोगाच्या महासागरातील ओंजळभर पाणी अनुभवण्याचा प्रयत्न करूया...
१. श्रद्धेचे प्रकार
आपल्या आहाराचा परिणाम आपल्या शरीर आणी मनावर होतो. अहो एवढच कशाला तर आहारामुळे काही अंशी स्वभाव देखील तयार होतो.
याच स्वभावानुसार माणसाची श्रद्धा तयार होते. याच श्रद्धेचे ३ प्रकार असतात.
- सात्विक श्रद्धा
- राजस श्रद्धा
- तामस श्रद्धा
हे तीन प्रकार माणसातील सत्व, रज आणि तम या तीन गुणांवर आधारित आहेत.
ज्या प्रमाणे एका बीजाला अंकुर फुटते मग खोड, फांद्या आणि फळाफुलांनी भरलेला वृक्ष निर्माण होतो आणि कालांतराने पुन्हा मातीत मिसळतो याचाच अर्थ वृक्ष तिथेच असतो तसेच शरीरात हे तीनही गुण चिरंतन आहेत.
कधी सत्व, कधी तम आणि कधी रज अशा तीनही गुणांचे प्रमाण शरीरात कमीजास्त होत असते. या विषयीचे विस्तृत विवरण आपण "गुणातीतायने" या अध्यायात पहिले.
आता जो गुण बलवान असतो तशी आपली श्रद्धा ठरते आणि हि श्रद्धा म्हणजे कर्माबद्दलची आणि ईश्वराची...
श्रद्धा हि प्रत्येकाचा आहार , आचार आणि विचारांवर अवलंबून असते.
याच गुणांमुळे मनुष्याची श्रद्धा समजते, ईश्वराने विविध लक्षणांमधून अशा गुणांचा प्रभाव स्पष्ट केला आहे परंतु नेहमी प्रमाणेच येथे आपल्या तरुण पिढीला समर्पक वाटतील अशी तीनही गुणातील व्यक्तींची निवडक आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
२. तमोगुणी माणसाची लक्षणे
हा माणूस कसा असतो ?
- अर्धवट शिजलेलं किंवा करपलेले अन्न खातात.
- गार अन्नग्रहण करतात .
- शिळे अन्न खातात.
- कर्म केल्याचे फक्त भासवतात !
- इतरांचे वाईट चिंतून श्रद्धा करतात.
- चोरीच्या पैशाचा पैशाचं दान करतात आणि तेव्हा उर्मट वागतात.
- चांगल्या गोष्टी समोरून आल्या तरी नको असतात.
३. रजोगुणी माणसाची लक्षणे
हि माणसे कशी असतात ?
- अतिशय गरम , तिखट, मसालेदार असा आहार असतो.
- प्रत्येक कर्मात स्वतःचा स्वार्थ शोधतात !
- ज्ञानी नाही तर भौतिक अर्थाने लोकप्रिय अशा कलाकारांना बोलावतात जेणे करून समाजात आणि स्वतःची कीर्ती वाढते .
- धनाचा प्रचंड अभिमान यांना असतो.
४. सत्वगुणी माणसाची लक्षणे !
- आहारात मधुर पदार्थ आधीक असतात!
- सात्विक आहार हा मन आणि शरीरच बळ वाढवते.
- शांत चित्ताने कर्म करतात.
- नदी समुद्राशी एकरूप होते तसे भगवंताच्या भक्तीत , आपल्या सार्वमत मनुष्याने एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- दान हेच कर्तव्य आहे असे समजतात.
५. कर्म आणि भक्ती श्रद्धा नसेल तर काय ?
तर शुद्ध भाव नसेल तर कर्म आणि ज्ञान वाया जात!
म्हणूनच शुद्ध भावाने भक्ती करावी आणि ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा.
जसे हे गुण तीन प्रकारचे आहे तसे ताशा ३ भिन्न श्रद्धा आहे.
श्रद्धेचे प्रकार,
- सत्वगुण राहा झाला कि श्रद्धा सात्विक होते.
- रजोगुण बलवान झाला कि अहोरात्र कर्म करतो परंतु अहंकार बाळगतो.
- तमोगुण बलवान झाला कि मनुष्य विवेकबुद्धी विसरून मनुष्य चुकीच्या दिशेकडे वळतो.
तर यांतील एखादा बलवान गुण कर्म करून घेतो आणि त्याचे आपल्यलाला योग्य फळ मिळते.
त्यावर अर्जुन विचारतात कि सर्वांना कसे माहित असेल या सर्वांबद्दल अशा वेळी काय करायचे ?
भगवंत यावर अतिशय सुंदर उदाहरण देतात कि उदा.एका गुरूने मेहनतीने एखादा दिवा लावला आणि त्याच्या शिष्याने त्यावर आपली छोटी पणती नेऊन त्यातून प्रकाश घेतला तरीही गुरूंचे नुकसान होत नाही .
अर्थात आपण नेहमीच गुरूंच्या संगतीत राहून संयमाने , अहंकार बाजूला ठेवून ज्ञानाचे ग्रहण करायला हवे...
इथेच अध्याय सतरावा श्रद्धादिनिरूपणयोग समाप्त झाला.
मित्रांनो बघता बघता एका सूक्ष्म बीजापासून ते सर्व सामावणाऱ्या त्या भगवंतापर्यंत सर्व प्रकारच्या ज्ञानाची महणता आपल्याला समजली.
आणि ज्ञानाचे कण वेचत असतानाच कधी आपण गीतेच्या शेवटच्या अध्यापर्यंत आलो हे लक्षात आलेच नाही.
परंतु आता शेवटचा अध्याय हा या सर्व अध्यांपेक्षा अतिशय महत्वाचा आणि गूढ आहे.
या अध्यात अशी कोणती उत्तरे मिळतात कि अर्जुन युद्धास सज्ज होतो.
हाच कृष्ण अर्जुन संवाद आपण ऐकणार आहोत पुढच्या अर्थात शेवटच्या अध्यायात
अध्याय अठरावा सर्वगीतार्थसंग्रहयोग ...



Comments