top of page
Logo - DWA (1).png
Logo - DWA (1).png

अध्याय दहावा - विभूतियोग

  • Writer: Alap Phadke
    Alap Phadke
  • 5 hours ago
  • 4 min read


अर्जुनाला आणि आपल्या सर्वांनाच पूर्वार्धातून आपल्या स्वतःपासून ते संपूर्ण सृष्टी ब्रह्माण्डाच्या ज्ञानाची ओळख झाली. या नंतर परमेश्वराने स्वतःची ओळख आपल्याला नवव्या अध्ययनात करून दिली त्या सोबतच संपूर्ण पूर्वार्धाचे सार देखील सांगितले. 

यावरून भगवंताला असे लक्षात आले कि अर्जुन हा उत्तम श्रोता आहे, ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा त्याला आहे. 


आपण एखाद्या घड्यात आधी थोडे पाणी भरून बघतो, त्यात गळती झाली नाही तर आपण समजतो कि हा पक्का माठ आहे मग आपण त्यात अगदी काठोकाठ भरेपर्यंत पाणी भरू शकतो. 


याच प्रमाणे अर्जुनाच्या क्षमतेची आणि उद्दिष्ठाबद्दल भगवंताला खात्री पटली आणि भगवंताने उत्तरार्ध सांगण्यास सुरुवात केली. 


अर्जुनाच्या याच पुण्याईमुळे समस्त विश्वाला अर्थात आपण सर्वांना देखील या महान ज्ञानाचा उपदेश समजून घेण्याची संधी मिळाली. 

यातूनच परमेश्वराची लीला आणि त्यांच्या अफाट सामर्थ्याची अनुभूती आपल्याला होते. 


याच सामर्थ्याची ओळख पटवून देण्यासाठी भगवंताने गीतेचा उत्तरार्ध अर्थात अध्याय दहावा - विभूतीयोग सांगण्यास सुरुवात केली. 


तर चला आपण सर्व देखील नेहमीप्रमाने संयम ठेऊन , अहंकाराचा त्याग करून , स्वच्छ उद्देशाने आणि अहंकार बाजूला सारून या महान उपदेशातून ज्ञानाचे काही कण. वेचण्याचा प्रयत्न करू ... 


१. भगवंत कधीपासून अस्तित्वात आहे ? 

भगवंत म्हणतात कि याचे उत्तर कोणाकडेच नाही , सृष्टीची उत्पत्ती होण्यापूर्वी , देवतांच्या आधी , सर्वात पूर्वी अनादिकालापासून परमेश्वराचे अस्तित्व आहे! 


ईश्वराला समजण हि सर्वात अवघड गोष्ट आहे ! 

ज्या प्रमाणे सागरातील माशाला महासागराची व्याप्ती कळत नाही , आभाळ किती विशाल आहे ते त्यालाच ठाऊक असते त्याच प्रमाणे ईश्वराची महती त्यालाच ठाऊक नाही का ? 


ईश्वर हा विश्वव्यापी आहे त्याची महती अनुभवून त्यातून आपण उपकृत होऊ असे ज्ञान वेचण्यात खरे शहाणपण आहे असे मला वाटते. 



२. उत्तरार्ध 


भगवंताने अर्जुनाची क्षमता ओळखली आणि त्याला गीतेचा उत्तरार्ध सांगण्यास सुरुवात केली, अर्थात अर्जुन ईश्वराशी एकरूप होण्याच्या इच्छेने संयम ठेवून , विश्वास ठेऊन आणि अहंकाराचा त्याग करून ज्ञान ग्रहण करण्यासाठी धडपड करत होता. त्याला कोणत्याही फळाची अपेक्षा नव्हती , अर्थात तो मनाने योगी (योगस्थ) होण्याच्या प्रयत्नांत होता. 

आणि जे भक्त भगवंताने सांगितलेला मार्ग स्वीकारून त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयन्त करतात भगवंत नेहमीच त्यांच्या सोबत असतो आणि प्रयेक पावलावर त्यांना मार्गदर्शन करत असतो . 


आजकालच्या भाषेत सांगायचं तर एका हिंदी चित्रपटात संवाद आहे कि "कहते हैं अगर किसी चीज़ को दिल से चाहो... तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है..." अर्थात Law of Attraction ! 


आपण आपले कर्म करत राहावे मग संपूर्ण सृष्टी अर्थात भगवंत आपल्या द्येयप्राप्तीसाठी पाठीशी उभा राहून सहाय्य करतात. 

परमेश्वराची हि असंख्य रूपे अर्थात भगवंताच्या विभूती ! 



३. विभूती कशा तयार होऊ लागल्या ? 


ईश्वर म्हणतो कि तो निर्गुण निराकार आहे मग त्याच्या विभूती कशा निर्माण होऊ लागल्या ? 

यासाठी माउलींनी अतिशय समर्पक असे उदाहरण दिले आहे ,

ज्या प्रमाणे एका बीजाला अंकुर फुटतो त्या नंतर त्याचे खोड आणि फांद्या निर्माण होतात . कालांतराने त्याला फळे फुले लागतात नई असा महावृक्ष तयार होतो परंतु याचे मूळ हे बीज असते. 


त्याच प्रमाणे ईश्वराच्या अनंत विभूती / रूपे आहेत परंतु त्या सर्वांचे मुळतत्व एकच आहे! 

भगवंताच्या मनात आले कि अनेक रूपात प्रकट व्हावे ! 

आणि त्यानुंत सात ऋषी आणि चार मनुची निर्मिती झाली यांनी लोकपालाचे निर्माण केले आणि त्यांनी लोक अर्थात समाजाची निर्मिती केली! 


या सर्वात भगवंत आहेत . 

ब्रह्मापासून ते एका मुंगीपर्यंत चराचरात भगवंताचा अंश आहे. 


त्याची अनेक रूपे आणि विभूती आहेत. 


४. भगवंताच्या विभूती 


भगवंताच्या अगणित असंख्य विभूती आहेत. 

ज्याप्रमाणे शरीरावरील केस मोजता येत नाहीत त्याप्रमाणे ईश्वराच्या विभूतींची गणना अशक्य आहे. 

भगवंताने अनेक विभूतींबाबद उपदेश केला आहे परंतु आपण आजच्या सध्या आणि सरळ भाषेत जेवढे शक्य तेवढे समजून घेण्याचा प्रयत्न करू ! 




आपल्या सर्वांच्या अंतःकरणात ईश्वर आहे. 

उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही परिस्थितींमध्ये ईश्वर आहे. 

सूर्य - चंद्रात भगवंत आहे ! 

साक्षात विष्णुरूपात भगवंत आहे ! 

पावसाच्या धारा  किंवा समुद्राच्या लाटांना गणना लागू होत नाही ! आपण त्या मोजू शकत नाही त्याप्रमाणेच विभूती देखील मोजता येत नाहीत मग आपण सर्वांनाच प्रश्न पडेल कि मग ईश्वराला कुठे शोधायचे तर


प्रत्येक कार्यातील सर्वोत्तम आहे त्यात ईश्वर आहे ! 


देवांमध्ये इंद्र 

शस्त्रांमध्ये वज्र 

वेदांमध्ये सामवेद 

शरीरात मन 

पर्वतांमध्ये मेरू 

अक्षरात अ अर्थात आकार 

ध्वनींमध्ये ओंकार 

यज्ञात जप 

वृक्षात पिंपळ 

पक्षांमध्ये गरुड 

गायिंमध्ये कामधेनू 

नद्यांमध्ये गंगा 

महर्षींमध्ये व्यास 

योध्यांमध्ये सर्वश्रेष्ठ श्रीराम 

आणि शिष्यांमध्ये सर्वोत्तम अर्जुनात ईश्वर आहे ! 


अर्थात आपण सर्वोत्तम भगवंताला शोधावे आहे सर्वोत्तमाकडे जाण्याचा प्रयत्न करावा ! 


या महान विभूती योगाचे सार किंबहुना या गीतेची शिकावण काही पानांमध्येच नाही तर लक्ष ग्रंथामध्ये करणे शक्य नाही तरीही आजकालच्या पिढीला समजेल आणि लवकर उमगेल अशा उद्देशाने हे धाडस करण्याचा प्रयत्न केला आहे. काही कमी अधिक झाले तर समजून घ्यावे ! 


५. उजळणी 


आत्तापर्यंत आपण गीतेचा पूर्वार्ध पूर्ण करून उत्तरार्धात ज्ञानाचे कण वाचण्यास सुरुवात केली आहे. 

-अध्याय पहिला अर्जुनविषाद योगात अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांमुळे कृष्ण अर्जुन संवाद सुरु झाला. 

- अध्याय दुसरा सांख्ययोगात स्थितप्रज्ञ मनुष्याबद्दल आपल्याला समजले. 

- अध्याय तिसरा कर्मयोगात आपल्याला कर्माचे महत्व समजले. 

- अध्याय चौथा ज्ञानसंन्यास योगात आपल्याला ज्ञानार्जनाचे महत्व समजले. 

- अध्याय पाचवा कर्मसंन्यासयोग किंवा योगगर्भयोगात आपल्याला योग्य मार्गाची ओळख पटली. 

- अध्याय सहावा आत्मसंयम योगात आपल्याला योगसाधनेचे महत्व आणि प्रक्रिया समजली. 

- अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग किंवा विज्ञानयोगात आपल्याला चार प्रकारचे भक्त आणि त्याचे ज्ञान याविषयी ओळख पटली. 

- अध्याय आठवा ब्रह्माक्षरनिर्देशयोगात आपल्याला ब्रह्माण्ड, सृष्टी आणि मृत्यूचे गूढ याची ओळख पटली. 

- अध्याय नववा राजविद्याराजगुह्ययोगात तर आपल्याला भगवंताची ओळख पटू लागली आणि सर्व श्लोकांचे सार आणि त्याच्या परस्परातील संबंध आणि आपली ध्येयपूर्ती अर्थात आपण काय आणि कसे करावे याबद्दल स्पष्टता मिळाली. 


अशा या सर्व योगांनी गीतेचा पूर्वार्ध संपून उत्तराधाला सुरुवात झाली आणि या महान भगवंताचे सामर्थ्य आपल्याला विभूतियोगातून समजण्यास सुरुवात झाली आणि इथेच विभूतीयोग अध्याय समाप्त झाला. 


या नंतर अर्जुनाला या महान, गूढ आणि सर्वव्यापी अशा भगवंताचे विश्वरूप दर्शन घेण्याची इच्छा झाली. 

आणि विश्वरूपदर्शनयोग प्रारंभ केला ...  



 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page