top of page
Logo - DWA (1).png
Logo - DWA (1).png

अध्याय चौदावा - गुणातीतयाने

  • Apr 21
  • 4 min read

या संपूर्ण सृष्टीशी , या प्रकृतीशी अर्थात परमेश्वराशी जोडला गेलेला मनुष्य हाच सुख उपभोगत असतो आणि त्याची वृद्धी होते हे आपण सर्वांना उमगले आहेच ! 


पहिल्या अध्यायापासून तेराव्या अध्यायापर्यंत मनुष्याने परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी कोणते मार्ग सांगितले ते आपण सावितर पहिले. 

परंतु आपण सर्वांना माहित आहे कि याचे आचरण करणे कठीण आहे. ईश्वराने सांगितलेले मार्ग सगळे बरोबर आहेत परंतु ते आपल्याला विशेषतः तरुण पिढीला प्रॅक्टिकली शक्य आहे का  असा प्रश्न नक्कीच पडला असेल ! 


आपण या स्तिथीत खरच जाऊ पाहतो आहे का ? आपल्याला हे सगळं या वयात खरंच हवं आहे का ? बरं हवं असेल तरी शक्य आहे का ? 


केवळ हीच गोष्ट नाही तर ज्या इतर गोष्टी आपल्याला हव्या असतात त्यासाठी आपण नियोजन अर्थात Planning करतो परंतु त्या आचरणात आणू शकलोय का ? 

म्हणजेच आपण केलेलं Planning हे आपण नेहमी Execute करू शकलोय का ? 


आपण मुळात निश्चय करू शकत नाही तो केला जरी तरी Planning Execute करू शकत नाही ! 

असं का होत ? 


मला देखील हा प्रश्न वारंवार त्रास देत कि आपल्याकडून गोष्टी ठरवल्या प्रमाणे का होत नाहीत ? 

पण म्हणतात ना तसे ईश्वरानेच या काळात ज्ञानेश्वरीची ओढ लावली आणि आज या अध्यायाची ओळख करून दिली ! 


आपल्या याच सर्व रहस्याचा आणि प्रश्नांचा उलगडा कराणारा हा योग आहे. संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचायचा किंवा समजून घ्यायचा संकल्प नसेल तरी हा चौदावा अध्याय सर्वांसाठी महत्वाचा आणि उपयुक्त आहे. 


तर मग चला प्रत्येक अध्यायाप्रमाणे किंवा त्यापेक्षा थोडं अधिक लक्ष देऊन , संयम ठेवून विनम्रतेने आपलय स्वतःचीच नव्याने ओळख करून घेऊया आणि सुरु करूया ज्ञानेश्वरीचा अध्याय चौदावा गुणातीतयाने ... 


१. आपल्यातील ३ गुण 


अनेकदा असं होत कि आपल्याला एखाद्या विषयाला धरून एका व्यक्तीचे म्हणणे पटते मग त्या व्यक्तीला आपण चांगले समजू लागतो परंतु दुसऱ्या विषयाला धरून त्या व्यक्तीची मते आपल्याला पटत नाहीत मग ती व्यक्ती लगेच आपल्यासाठी वाईट होते. किंवा अनेकदा विषय तोच असतो परंतु काही काळाने त्या व्यक्तीची मते आपल्याशी पुन्हा जुळतात आणि पुन्हा ती व्यक्ती आपल्यासाठी चांगली होते... 

आपल्या सर्वांसोबत असं नक्की झालं असेल, 

आता जर प्रश्न केला कि असं का होत ? तर आपल्यातील ९९% लोक परिस्थिती अर्थात Situation असे उत्तर देतील  !


परंतु परिस्थिती हे वरवरचे किंवा बाह्य कारण आहे. या बदलाचे खरे कारण आपल्या आत आहे. 


यासाठी आपल्यातील ३ मुख्य गुणांची ओळख पटवून घेऊ ! 


तमोगुण 

रजोगुण 

सत्वगुण 


जशा प्रत्येक शरीराच्या बालपण, तरुणपण आणि वार्धक्य अशा ३ स्थिती आहेत तसेच प्रत्येकात हे ३ गुण असतात. अनेक कारणांनी त्याचे प्रमाण कमी जास्त होत राहते परंतु त्यासाठी आधी 

आता हे गुण कसे आहेत किंवा एखाद्या व्यक्तीवर कोणत्या गुणांचा प्रभाव जास्त आहे हे कसे ओळखावे यासाठी आधी या तीनही गुणांचा प्रभाव असलेल्या व्यक्तींची लक्षणे समजून घेऊ यानेच आपल्याला स्वतःचा आणि इतरांचा स्वभाव अधिक चांगल्या पद्धतीने ओळखण्यास मदत होईल ! 


२. तमोगुणी माणूस कसा असतो ? 

- सतत उदास असतो 

- कस वागावं ? कस बोलावं याच भान नसत! 

- कर्म करायची इच्छा नसते आणि कोणी चांगलं केलं तरी नको असत यालाच समर्पक उदाहरण देताना माउली म्हणतात कि अशा व्यक्तींना अमृत दिल तरी त्यांना त्यांची झोप महत्वाची असते. 

- प्रचंड आळशी असतो. 

- सुविचार, ज्ञान हे नकोच असते त्यामुळे अज्ञानात चुकीचे कृत्य करून बसतो. 

- सतत बढाया मारून न झेपणारे काम अंगावर घेतो आणि स्वतःचे नुकसान करतो. 

- कोणतीही प्रेरणा नसते. 

- केवळ नाईलाज म्हणून कर्म करतो. 

- मन कधीच ठिकाणावर नसत 

- कर्तृत्व शून्य परंतु ब्रह्माण्ड एवढा माज असतो. 

- चुकीचे काम करण्यास देखील तयार असतो. 

- सतत नकारात्मक असतो. 


३. रजोगुणी माणूस कसा असतो आणि त्याची लक्षणे कोणती ? 


- सतत कशाची ना कशाची हाव असते. 

- भविष्याची चिंता सतत करत असतात. 

- सतत काहीतरी मिळविण्याची इच्छा असते. 

- स्वतःच्या पुण्य प्राप्तीसाठी अर्थात स्वार्थाने समाजसेवा करतो. 

- स्वतःच्या कर्माचा प्रचंड अहंकार असतो. 

- कितीही काही मिळाले तरी एखाद्या अपूर्ण इच्छेने कायम दुःखी असतो. 


४. सत्वगुणी माणूस कसा असतो आणि त्याची लक्षणे कोणती ? 

- ज्ञानाने संतुष्ट असतो. 

- सदबुद्धीने वागतो 

- जसा राजहंस पाणी आणि दुधाला वेगळे करतो तास चूक आणि बरोबर यातील फरक समजतो. 

- सर्व इंद्रिये ताब्यात ठेऊन निर्णय घेतो. 

- सकारात्मकता वाढवतो 


५. या विविध गुणांमुळे आपल्याला कोणते फळ मिळते ? 


- सत्त्वगुणांचे फळ निर्मळ असते आपल्याला ज्ञानप्राप्ती किंवा पुण्यप्राप्ती होते. 


- रजोगुणाचे फळ के कडुलिंबासारखे असते बाहेरून छान परंतु आतून कडू असते कारण या गुणात प्रत्येक कर्मामागे उद्दिष्ट हे स्वार्थ असते. 


-तमोगुणाचा परिणाम सगळ्यात घातक असतो ते म्हणजे अज्ञान वाढते परिणामी मनुष्य ईश्वरापासून अधिकाधिक दूर जातो. 



६. गुणांची स्पर्धा आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर... 




विविध विषयात , विविध प्रसंगात,  विविध व्यक्तींसाठी आणि विविध काळात आणि अशा अनेक कारणांमुळे जसे ऋतू बदलतात तसे या तीनही गुणांचे प्रमाण आणि परिणामी त्यांचा प्रभाव हा बदलत राहतो. यासोबतच घेतलेल्या चांगल्या वाईट निर्णयांचे फळ अर्थात सुख-दुःख माणूस भोगत असतो. 


त्यातल्या त्यात सत्वगुणी होणे बरे परंतु त्यात देखील आपल्यलाला अहंकार होण्याचा धोका असतो 

म्हणूनच भगवंताने "गुणातीतयाने" म्हणजेच या तीनही गुणांचा प्रभाव मर्यादित असावा आणि आपण योग्य निर्णय घेऊन कर्म करावे असा उपदेश केला आहे. 


अर्थात या सर्वांचे सार म्हणजे आपण स्थितप्रज्ञ होऊन कर्म करावे, ज्ञानार्जन करावे, मिळालेले फळ भगवंताला अर्पण करावे आणि अहंकार दूर ठेवावा अर्थात मनाने योगी व्हावे ! म्हणजेच आपण वाईटातून चांगल्याकडे, चांगल्यातुन उत्तमाकडे आणि उत्तमातून सर्वोत्तम होऊ आणि ईश्वराशी एकरूप होऊ. 


अर्थात अर्जुनाला तथा  आपल्या सर्वांना पुन्हा प्रश्न पडला कि सर्वोत्तम कसे व्हावे ? आणि त्या निर्गुण निराकार भगवंताने अर्जुनाला पुढील आणखी गहन, महत्वाचा आणि सर्वोत्तमाकडे जाण्याचा मार्ग सांगण्यास सुरुवात केली. 


आणि अशा तऱ्हेने गुणातीतयाने या अध्यायाची सांगता झाली आणि अध्याय पंधरावा "पुरुषोत्तमयोगाचा" आरंभ झाला !  


 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page